'राज्य सरकारला आणीबाणी विरोधकांचं वावडं असणं स्वाभाविकच'

    दिनांक  28-Jul-2020 13:58:42
|

atul bhatkhalkar_1 &


मुंबई :
आणीबाणी विरोधकांना मागील दोन वर्षांपासून दिले जाणारे मानधन रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याच्या वृत्ताचा हवाला देत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. आणिबाणीविरोधी आंदोलनात सामील झालेल्या तीन हजार लोकांची पेन्शन रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सोनिया मातोश्रींच्या दबावाखाली घेतलाय काय? असा सवाल भातखळकर यांनी ट्विट करत उपस्थित केला.ते म्हणतात, "आणिबाणीविरोधी आंदोलनात सामील झालेल्या तीन हजार लोकांचे पेन्शन रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सोनिया मातोश्रींच्या दबावाखाली घेतलाय काय? असा सवाल उपस्थित करत आणिबाणीविरोधी आंदोलनात सामील झालेल्या तीन हजार लोकांचे पेन्शन रद्द करण्याचा निर्णय पत्रकारांना तुरुंगात टाकणाऱ्या,सोशल मीडियावरील पोष्टींवर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारला आणीबाणी विरोधकांचे वावडे असणे स्वाभाविकच नाही काय? असे म्हणत त्यांनी राज्यसरकारला टोलाही लगावला.१९७५मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोध करणारे व १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगलेले या योजनेस पात्र होते. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हे मानधन सुरु करण्यात आले होते. दरमहा १० हजार रुपये व संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यास पत्नीला ५ हजार रुपये असे मानधनाचे स्वरूप होते. मात्र २३ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मानदान रद्द करण्याचा निर्णय झाला. याचा फटका राज्यातील ३ हजार वयोवृद्ध कार्यकर्त्यांना बसणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.