कल्याण डोंबिवलीत बिकट अवस्था, १९ हजार कोरोना रुग्ण

28 Jul 2020 19:25:26

corona testing_1 &nb





कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी १९ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २०७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून ३०६ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १९,०३२ झाली आहे.

यामध्ये ५७७९ रुग्ण उपचार घेत असून १२,९२७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -२५, कल्याण प.-७१, डोंबिवली पूर्व -५१, डोंबिवली प-५२, मांडा टिटवाळा ५, मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे.
 

 
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, होलीक्रोस रुग्णालयातून ४ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत. दरम्यान आज कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी आल्याने कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.




Powered By Sangraha 9.0