आम्हाला काय म्हणायचे हे अजितदादांनी फोटोतून दाखवून दिले : विनायक मेटे

    दिनांक  27-Jul-2020 12:44:51
|
vinayak_1  H x

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला!

मुंबई : अजित पवार हे मंत्रालयात बसून काम करतात. मुख्यमंत्र्यांनी आपल्याचा हातात स्टेअरिंग असल्याचे म्हणू द्या, पण अजितदादांनी फोटो ट्विट करून सगळे सांगितले आहे, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अजित पवार यांच्या हातात गाडीचे स्टिअरिंग असून मुख्यमंत्री त्यांच्या शेजारी बसले आहेत.


शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत प्रसिद्ध झाली. यामध्ये सरकार तीन पक्षांचं असलं तरी स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान केले होते. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची आता चांगलीच फिरकी घेतली आहे.


तसेच उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार हे तीन मुख्यमंत्री सध्या राज्याचा कारभार पाहत आहेत. दुर्दैवाने काँग्रेस या सगळ्यातून बाहेर आहे. आपण सरकारमध्ये आहोत, हे काँग्रेस स्वत:ही मान्य करत नाही. काँग्रेस पक्ष फक्त नावापुरता सरकारमध्ये आहे, अशी बोचरी टीकाही मेटे यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.