नेहरु-गांधी कुटुंबीयांच्या हरयाणातील मालमत्तांची चौकशी होणार!

27 Jul 2020 15:44:38
congress_1  H x

इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टला दिलेल्या जागेची माहिती गोळा करण्यास सुरुवात!


चंदीगड : हरियाणा सरकारने राज्यात राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टला दिलेल्या जागेची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. हरियाणाचे मुख्य सचिव केशानी आनंद यांनी नागरी स्थानिक संस्था विभागाच्या सचिवांना पत्र लिहून राज्यातील तीन विश्वस्तांना दिलेल्या जागेची माहिती लवकरात लवकर मागितली आहे.


मुख्य सचिवांनी लिहिलेल्या या पत्रात, विश्वस्तांना दिल्या गेलेल्या जागेबद्दल, ही जागा नेमकी किती व कुठल्या राज्यात दिली गेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर माहिती देण्याचे आदेशही नागरी स्थानिक संस्था विभागाच्या सचिवांनी दिले आहेत.


केंद्रीय समितीकडून या तिन्ही ट्रस्टच्या व्यवहार आणि देशभरातील जमिनीची चौकशी केली जात आहे. याच समितीने हरियाणा सरकारकडे ही माहिती मागितली होती. राजीव गांधी फाउंडेशनने चीनी दूतावासाला दिलेला निधी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.


त्यानंतरच, हरियाणा सरकारला राजीव गांधी फाउंडेशन, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला जोडलेल्या मालमत्तांची तपासणी करण्यास केंद्र सरकारने सांगितले. केंद्राच्या या आदेशानंतरच हरियाणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना गांधी-नेहरू कुटुंबातील मालमत्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.



Powered By Sangraha 9.0