शेअर बाजारात १ ऑगस्टपासून नवी नियमावली

27 Jul 2020 18:17:00

bse _1  H x W:




मुंबई : शेअर बाजारावरील नियामक संस्था असलेल्या सेबीतर्फे गुंतवणूकदारांसाठी नवी नियमावली लागू करण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून शेअर विक्री करण्यासाठी २० टक्के कॅश किंवा शेअर्स तारण स्वरुपात मार्जिन द्यावे लागणार आहे. तसेच शेअरची विक्री केल्यानंतर दोन दिवसांनी नवा शेअर खरेदी करता येणार आहे. या एका नियमावलीमुळे गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडणार आहे.


शेअरची विक्री झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. सेबीने एक सर्क्युलर जारी केले आहे. यानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअरची विक्री झाल्यांनंतर मार्जिन द्यावे लागणार आहे. तसेच शेअर विक्री केल्यावर दोन दिवसांत त्याचे पैसे खात्यात जमा होतील.


कोरोना आपत्तीजनक स्थिती असताना नव्या नियमावलीचा फटका बाजाराला बसतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ब्रोकर्स आणि किरकोळ गुंतवणूकदारांची यामुळे चिंता वाढली आहे. बाजारात नव्याने येणाऱ्या आणि जुन्या गुंतवणूकदारांवरही याचा परिणाम होणार आहे.


उदा. एखाद्या व्यक्तीने सोमवारी शंभर रुपयांचा शेअर विक्री केला तर त्याला विक्रीपूर्वी २० रुपयांचे कॅश मार्जिन द्यावे लागणार आहे. जोपर्यंत त्या शेअरचे मार्जिन दिल्याशिवाय शेअर विक्री करता येणार नाही. दुसरा नियम म्हणजे, शेअर विक्री केल्यानंतर दुसरा शेअर लगेच खरेदी करता येत होता, परंतू आता दुसरा शेअर विक्री केलेल्या पैशांतून पेमेंट सेटल केले जात होते. परंतू आता तसे न करता विक्रीनंतर दोन दिवसांनंतर रक्कम खात्यात वळती होईल.




त्यानंतरच दुसरा शेअर खरेदी करता येणार आहे. याचा फायदा म्युच्युअल फंडधारकांना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शेअर बाजारात थेट गुंतवणूकदारांची खरेदी विक्री प्रक्रिया वाढत असल्याने याचा फटका म्युच्युअल फंड कंपन्यांना बसत होता. म्युच्युअल फंडमधून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले होते. या निर्णयामुळे गुंतवणूकदार पुन्हा म्युच्युअल फंड्सकडे वळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.







Powered By Sangraha 9.0