राम मंदिर नव्हे ‘कोरोना’ प्राधान्य म्हणणारे पवार ‘कुर्बानी’च्या बैठकीला

27 Jul 2020 18:44:20

Sharad  Pawar_1 &nbs





मुंबई
: काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा मुहूर्त निघाल्यावर सोलापूर दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांनी आमचे प्राध्यान्य राम मंदिर नसून कोरोना आहे, असे म्हटले होते. काही लोकांना असे वाटते की, मंदिर निर्माण केल्याने कोरोना संपेल, अशी टीकाही त्यांनी केंद्रातील सरकारवर केली होती. मात्र, १ ऑगस्ट रोजी असणाऱ्या बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यावर सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक घेतली. कोरोनाच आमचे प्राध्यान्य आहे, असे सांगणाऱ्या पवारांना कुर्बानीसाठी मंत्र्यांची वेगळी बैठक घ्यावी लागत असल्याने राजकीय वर्तूळात चर्चा आहे.


दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अबू आझमी यांच्यासह अन्य सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कुर्बांनी आणि ऑनलाईन बकरा खरेदीवरून चर्चा झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. महाविकास आघाडीत अनेक नेत्यांमध्ये कुर्बानीवरून वाद आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांनीही मंत्रीमंडळ निर्णयात अनेक निर्बंध लावल्याने मुस्लीम समाजात नाराजीचे वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मध्यस्ती करून बैठक घ्यावी लागत आहे. दरम्यान, या सर्व प्रश्नावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.






Powered By Sangraha 9.0