'हा दिवस भविष्यातील रूपरेषा ठरविण्याचा' ; पंतप्रधानांचे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा पत्र

    दिनांक  27-Jul-2020 13:19:51
|

PMO_1  H x W: 0मुंबई :
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून आणि ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच,आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे.पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे, "वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे" असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो." असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांप्रती आभार व्यक्त केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.