राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून याचिका मागे

    दिनांक  27-Jul-2020 11:35:19
|

rajsthan_1  H xराजस्थान : राजस्थानमधील राजकीय संघर्षाचा आज १८वा दिवस आहे. सोमवारी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिकांवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यात तणाव वाढत आहे. रविवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना नवीन प्रस्ताव पाठविला. तर विधानसभेच्या सभापतींनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे.सभापतींनी याचिका मागे घेतली


राजस्थान विधानसभा सभापतींचे वकील कपिल सिब्बल यांनी ही याचिका मागे घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली. सिब्बल म्हणाले की, यावर सुनावणीची आवश्यकता नसल्याचा विचार केल्यानंतर आम्ही याचिका मागे घेत आहोत. आम्ही आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येऊ. यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे. सचिन पायलट गटाच्या याचिकेवरील उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.