ऑटोरिक्षा कुठे न्यायचा हे चालक नाही त्यातील सवारी ठरविते

27 Jul 2020 20:10:51

devendra fadnavis _1 



मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवसभर सोशलमिडीयावर चर्चेचा विषय ठरला. सामानाला मुलाखत देताना ठाकरे सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुलाखतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.







दरम्यान, रविवारी पक्षाच्या शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवीत म्हटले होते की सत्ताधारी महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये स्टीयरिंग व्हील त्यांच्या हातात आहे. "माझ्या सरकारचे भविष्य विरोधकांच्या हातात नाही.स्टेअरिंग माझ्या हातात आहे. रिक्षा हे गरीब लोकांचे वाहन आहे. बाकीचे दोघे मागे बसले आहेत." असे ठाकरे म्हणाले होते.



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी सरकारची तुलना तीन चाकी वाहन रिक्षाशी केली होती. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या विचारसरणीमुळे सरकारच्या स्थिरतेवर शंका निर्माण केली. यावरून पुन्हा एकदा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावत तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते असे म्हंटले आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.


Powered By Sangraha 9.0