आयपीएल २०२० ! दुबईकडून होकार आता भारतीय सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

27 Jul 2020 19:34:07

IPL 2020_1  H x
 
मुंबई : आयपीएल २०२० साठी हालचाली सुरु झाल्या असून बीसीसीआय दुबईमध्ये स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बीसीसीआयने अमिराती क्रिकेट बोर्डला (ईसीबी) एक स्वीकृती पत्र पाठवले. आयपीएलच्या आयोजनासाठी त्यांच्याकडून होकार आला असून आता भारत सरकार याबाबतीत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी माहिती दिली की, “आम्ही एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला स्वीकृतीपत्र पाठवले आहे आणि दोन्ही मंडळे आतापासून या स्पर्धेसाठी एकत्र काम करणार आहेत.”
 
 
ईसीबीकडून आलेल्या या पत्रामुळे आता बीसीसीआयचा आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, बीसीसीआयला भारता सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. “आम्हाला बीसीसीआयकडून आयपीएल आयोजनासंदर्भात अधिकृत पत्र मिळाले असून आमच्याकडून त्यास कोणतीही हरकत नाही. आता केवळ भारत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. कारण यावर अंतिम निर्णय हा भारत सरकार घेणार आहे. दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र काम करणार आहोत.” अशी माहिती एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे महासचिव मुबशीर उस्मानी यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0