जनता त्रस्त गृहमंत्री फोटोशूटमध्ये व्यस्त

    दिनांक  27-Jul-2020 18:50:13
|

anil deshmukh_1 &nbsमुंबई :
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  रविवारी मरिन ड्राइव्ह येथे फरफटका मारत समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना दिसले. यावरून राज्य सरकारला परिस्थितीचे गांभीर्य आहे की नाही ? अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होताना दिसतो. महाराष्ट्रासमोर कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्नांचा घेराव घातला. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.