क्रिकेटमध्ये वय हा मुद्दा नाहीच ; धोनीच्या निवृत्तीवर गंभीरची पाठराखण

27 Jul 2020 16:16:49

Dhoni Gambhir_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : सध्या बीसीसीआयने काही दौरे रद्द करत, आयपीएलच्या आयोजनाची तयारी केली आहे. यावर आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघामधील पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने सांगितले की, “निवृत्ती कधी घ्यावी? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धोनी जर तंदुरुस्त असेल तर त्याने खेळायलाच हवे.” अशी इच्छा व्यक्त केली आहे.
 
 
गौतम गंभीर म्हणला की, “कुणीही कुणावर निवृत्तीसाठी दबाव आणू शकत नाही. क्रिकेटमध्ये वय हा मुद्दा नसतोच. जर एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर त्याने खेळत रहावे. वय म्हणजे एक आकडा आहे. माझा विश्वास आहे की धोनी जर चांगल्या प्रकारे चेंडू फटकावत असेल. तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि खेळाचा आनंद घेत असेल तर त्याने मैदानात आपला खेळ दाखवायलाच हवा. तसेच धोनीने ६ किंवा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने देश जिंकू शकतो.” असा विश्वास त्याने दर्शविला.
 
 
“धोनी तंदुरुस्त आहे. त्याचे पुनरागमन होणे आवश्यक आहे. धोनीवर त्याच्या वयावरून बरेच तज्ज्ञ दबाव टाकत आहे. परंतु, मी पुन्हा सांगेन की निवृत्तीचा निर्णय धोनीचा वैयक्तिक आहे. जेव्हा आपण खेळण्यास प्रारंभ करता, तेव्हा तो आपला स्वतःचा निर्णय असतो. तशाच प्रकारे, जेव्हा तुम्हाला क्रिकेट सोडावे लागेल, तेव्हा हा निर्णय तुमचा वैयक्तिक देखील असावा. महेंद्रसिंह धोनी जर तंदुरुस्त असेल तर त्याने खेळायलाच हवे.” असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0