चीनच्या हुवावे कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |
huwaie _1  H x
 



नवी दिल्ली : गेल्या महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमावादात २० जवान हुतात्मा झाले. यानंतर संपूर्ण देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली. देशवासीयांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली. याचे पडसाद आता हळूहळू उमटू लागले आहेत. चीनी मोबाईल ब्रॅण्ड्समध्ये अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या हुवावे कंपनीने आपली गुंतवणूक कमी करत भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.


भविष्यात भारतातून व्यापार करता येईल की नाही याबद्दल कंपनीने साशंकता व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत चीनी टेलिकॉम कंपनीला भारतातून मिळणाऱ्या उत्पनात घट झाली आहे. परिणामी कंपनीने भारतातील कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. हुवावे कंपनीने २०२० या आर्थिक वर्षात तिनशे ते पाचशे दशलक्ष डॉलर्स इतके ठेवले आहे. यापूर्वी सातशे ते आठशे दशलक्ष डॉलर्स इतकी उलाढाल कंपनीला अपेक्षित होती.


कंपनीने आता ६० ते ७० टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल सर्विस सेंटरमध्ये संशोधन करणारी टीमही कमी केली जाणार आहे. चीनी सैन्याशी झालेल्या झटापटीत एकूण २० जवान हुतात्मा झाले. या पार्श्वभूमीवर चीनविरोधात उठलेल्या संतापाच्या लाटेचा फटका चीनी कंपन्यांना बसत आहे. कोरोनामुळे जगातील देशांतही चीनविरोधात वातावरण तयार झाले आहे. डेटा चोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारने चीनच्या ५९ अँप्सवर बंदी आणली होती.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@