राजस्थानमध्ये काँग्रेस बॅकफूटवर ? काँग्रेसचे राजस्थान वगळता देशभर निदर्शने

    दिनांक  27-Jul-2020 12:04:27
|

rajsthan _1  Hराजस्थान :
कॉंग्रेस राजस्थान वगळता देशभर राजभवनांवर निदर्शने करीत आहे. कॉंग्रेसने सोशल मीडियावर 'स्पीकअप फॉर डेमोक्रेसी' मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून आज काँग्रेस देशभर राजभवनासमोर निदर्शने करत आहे.राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा यांनीही राजस्थानमधील राजभवनाला घेराव न घालण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. याचे कारण सांगताना ते म्हणतात, यापूर्वीच राजस्थानमध्ये राजभवनाला घेराव घातला होता. दुसरे म्हणजे, राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलविण्याच्या आक्षेपाला उत्तर पाठवले आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल अधिवेशन घेण्यासाठी नकार देऊ शकणार नाहीत, त्यामुळे राजभवनाला घेराव घालण्यात अर्थ नाही.मात्र, दैनिक भास्करच्या वृत्तानुसार राजकीय तज्ज्ञांच्या मते, राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कॉंग्रेस बॅकफूटवर असल्याचे राजकीय तज्ज्ञ म्हणतात. तीन दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री गहलोत आणि त्यांच्या आमदारांनी राजभवनाला घेराव घातला होता तेव्हा राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मागील काही दिवसांतील राजकीय संघर्षामुळे राज्यपालांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत रविवारी मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला. यावरून असे दिसते की,कॉंग्रेसने पुन्हा एकदा राजभवनाला घेराव घातला आणि राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा दलाला बोलाविण्याचा निर्णय घेतल्यास सरकार स्थापनेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.