बदलती परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेस अनुकूल : गव्हर्नर

27 Jul 2020 17:14:04

Shaktikant Das _1 &n





नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (CII) कॉन्फरन्सला संबोधित केले. बदलती अर्थव्यवस्थेतील परिस्थिती भारताच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. नॅशनल कौन्सिलच्या सदस्यांना संबोधित करताना अर्थव्यवस्थेसंदर्भात घेण्यात आलेले पाच मोठे बदल यासाठी कारणीभूत ठरणार आहेत, असेही ते म्हणाले.


या बदलांना 'संरचानत्मक परिवर्तन' स्वरुपात पाहिले जाणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा लाभ होणार आहे, येत्या काळात भारतीय उद्योगांची भूमिका महत्वाची असणार आहे. याला 'साइलेंट रिवोल्यूशन', असेही म्हटले जाऊ शकते. भारतने आता जागतिक मुल्य साखळी (ग्लोबल व्हॅल्यू चेन) बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत नव्या क्षमता उपलब्ध झाल्या आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शक्तिकांत दास म्हणाले, “बिगर वित्तीय कंपन्यांना मी कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी कोरोना संकटकाळाचा नेटाने प्रतिकार करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात अशा संकटकाळाशी लढण्यासाठी राखीव निधी ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांना सांगितले आहे.“ 


कृषि क्षेत्रातील बदलांमुळे नव्या संधी निर्माण होण्याच्या संधई आहेत. कृषि संदर्भात अशा योजनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भारताने अमेरिकेसह अन्य देशांशी मुक्त व्यापार कसा करता येईल, याकडे आता लक्ष द्यायला हवे. इन्फ्रास्ट्रक्चरक सेक्टर प्रोत्साहीत होईल तसेच या क्षेत्राच्या भरीव वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. खासगी व सार्वजनिक क्षेत्राच्या मुलभूत विकासासाठी हे महत्वाचे ठरणार आहे.  बॉण्ड मार्केटमध्ये गतीने सुधारणा होत आहे, पहिल्या तिमाहीत एक लाख कोटींचे कॉर्पोरेट बॉण्ड बाजारात आले आहेत. रिझर्व्ह बँक सतर्क आहे, तसेच गरज भासल्यास आवश्यक ती कारवाई करण्यासही कुचराई करणार नाही, असे गव्हर्नर यांनी सांगितले. 











Powered By Sangraha 9.0