उद्धव ‘सरकार’च्या गाडीचे चालक अजित पवार!

    दिनांक  27-Jul-2020 10:33:48
|

uddhav_1  H x Wउपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. राज्यभरातून मुख्यमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय बनला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा ‘जो’ फोटो ट्विट केला आहे त्या फोटोमुळे चर्चेला उधाण आले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.


नुकतीच मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले होते, आमचे तीन चाकी सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी हे सरकार चालवत आहे. त्यातील कार्यपद्धती आणि भूमिका जरी काही अंशी वेगळ्या असल्या तरीही या सरकारचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे, हे सांगितले होते.


अर्थात या मुलाखतीतील सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात, असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आणि आज मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी वाहनाचं स्टेअरिंग आपल्या हाती असलेला फोटो शेअर करणे हे राज्याच्या राजकारणात खूप काही सूचित करत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.