ऐश्वर्या आणि आराध्या झाल्या कोरोनामुक्त!

    दिनांक  27-Jul-2020 17:44:07
|

aishwarya aaradhya_1 नानावटी रुग्णालयातून घरी रवाना; अभिषेक-बिग बींवर अद्याप उपचार सुरु!


मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या अमिताभ आणि अभिषेक हे दोघेही नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ऐश्वर्या-आराध्याला १७ जुलै रोजी ताप आल्याने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल दहा दिवस त्यांच्यावर नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु होते.


ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे अभिषेकने ट्विट करुन सांगितले आहे. अभिषेकने ट्विट केले की, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे. सुदैवाने ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्या आता घरी आहेत. सध्या मी आणि माझे वडील रुग्णालयातच असल्याचेही त्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.


बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या जलसा बंगल्याला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. रविवारी मुंबई महापालिकेने जलसावरील कंटेन्मेंट झोनचा बोर्ड काढला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.