शिवसेनेच्या प्रभागात भाजपतर्फे जंतुनाशक फवारणी

    दिनांक  26-Jul-2020 17:58:19
|

Uddhav Thackeray _1 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे रविवारी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विशेष मोहीम राबवून कार्यकर्त्यांनी जंतुनाशक फवारणी केली. दादर, प्रभादेवी, माहीम परिसरात कोरोणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाजपचा माहीम विधानसभा पदाधिकार्‍यांच्या वतीने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
दादर शिवाजी पार्क महापालिका वॉर्ड क्रमांक १९१ या संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. रविवार असताना भाजपाचे कार्यकर्ते टी-शर्ट घालून आणि जंतुनाशक फवारणी पंप पाठीवर घेऊन शिवाजी पार्क परिसरात फवारणीसाठी उतरले. हा संपूर्ण परिसर वर्दळीचा असून शिवाजी पार्क मैदानाच्या चारी बाजूने, फवारणी करून वॉर्ड क्रमांक १९१ मधील सर्व गल्ल्या, रस्ते परिसरातही दिवसभर फवारणी करण्यात आली. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.शिवाजी पार्क हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच या भागातील बाळासाहेब ठाकरे स्मारक, महापौर निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचे बंधू व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थानही आहे. काही दिवसांपासून या भागात वाढत चालली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन भाजपतर्फे ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवसेना भवन परिसरासह अन्य ठिकाणी औषध फवारणी केली आहे. शनिवारी मुंबईतील इतर भागांतही भाजपतर्फे ही प्रक्रीया राबवण्यात आली होती. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.