राज्यात दोन मुख्यमंत्री एक मातोश्रीत दुसरे दौऱ्यावर !

26 Jul 2020 16:21:51

CM Uddhav and Sharad Pawa


पुणे : महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री लाभले आहेत, एक 'मातोश्री'मध्ये बसून काम पाहतात, तर दुसरे राज्यभर फिरतात, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार या दोघांचा त्यांनी समाचार घेतला.

चार महिन्यांनी उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. हिंमत असेल तर त्यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्या, मुलाखत घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून कारभार हाकतात, दुसरे राज्यभर दौरा करतात, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 


उपमुख्यमंत्र्यांना अपयशी कोण ठरवतंयं ?

उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावे, पुण्यातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अजित पवार अपयशी ठरत आहेत, हे दाखवायचे प्रयत्न कोण करत आहे, हे तुम्ही पहा असे म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे चंद्रकांत पाटलांनी इशारा केला. सरकार जाणार नाही, हे वक्तव्य कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठीच दोन्ही नेते करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.


भांडतात आणि म्हणतात, सगळं ठिक आहे !


सरकारमध्ये तीनही पक्ष भांडतात, मग परत काहीच झालं नाही, असं सांगतात. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीत, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहायला सांगितला तरी ते लिहीतील, अशी टीका त्यांनी केली.





Powered By Sangraha 9.0