“आधी राजकारण्यांनी राजीनामे द्या, मग ज्येष्ठ कलाकारांवर बंधने घाला”

25 Jul 2020 11:50:34

Vikram gokhle_1 &nbs
 
मुंबई : ठाकरे सरकारने काही अटींसह राज्यामध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली. मात्र, ६० वर्षांवरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही अशी अटदेखील त्यामध्ये आहे. यावर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त करत, “आधी ६० वर्षांवरील राजकारण्यांनी राजीनामे द्यावे, मग ज्येष्ठ कलाकारांवर शूटिंगसाठी बंधने घालावीत.” अशी टीका केली.
 
 
 
गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होते. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती. त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी सहभाग घेता येणार नाही. मात्र, सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “६५ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी. असा कायदा आणण्याआधी राजकारणातील ६० वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे,” असा सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0