९ कर्मचाऱ्यांचे निलंबन ; तुकाराम मुंडेचा दणका

25 Jul 2020 11:00:40

Tukaram Munde_1 &nbs
 
नागपूर : महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनीधींचा वाद सध्या टोकाला जाऊन पोहचला आहे. मात्र या परिस्थितीतही मुंढे यांच्या धडक कामगिरीवर कसलाच परिणाम झालेला नाही. २४ जुलैला सकाळी सहा वाजता मुंढे अचानकपणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात हजर झाले. यावेळेस कोरोना नियंत्रण कक्षेतील कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली जबाबदारी पार न पाडल्याने आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
 
पालिकेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वाराच्या बाजूलाच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असून कर्मचारी याठिकाणी शिफ्टप्रमाणे काम करत असतात. शुक्रवारी अचानक मुंढे कोरोनाच्या परिस्थितीत कोरोना नियंत्रण कक्षाचं काम पाहण्यासाठी मुख्यालयात पोहचले. मात्र रात्रीच्या शिफ्टमधील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे मुंढे यांच्या निदर्शनास आले.
 
यानुसार किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांच्यावर मुंढे यांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली. तसेच यापुढे मुंढे यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशनलाही भेट दिली. शहरातील प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणीदेखील मुंढे यांनी केली. यावेळेस कामचुकार स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी यांच्यावरही मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
Powered By Sangraha 9.0