४०० वर्षांच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी महामार्गाचा नकाशा बदलला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |

Tree_1  H x W:
 
 
सांगली : सांगलीतील मिरज तालुक्यातील भोसे गावाच्या महामार्गालगत असलेल्या ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला जीवनदान मिळाले आहे. रस्ता रुंदीकरण कामामध्ये हा ४०० वर्षे जुना वटवृक्ष अडथळा बनला होता. परंतु काही वृक्षप्रेमींनी याला जोरदार विरोध दर्शविला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
महामार्गाचे काम चालू असताना अनेक वृक्ष जमीनदोस्त करण्यात आली. त्यातच सांगलीतील मिरज तालुक्यातील भोसे गावाच्या महामार्गालगत असलेल्या ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला जीवनदान मिळाले आहे. रस्ता रुंदीकरण कामामध्ये हा ४०० वर्षे जुना वटवृक्ष अडथळा बनला होता. परंतु काही वृक्षप्रेमींनी याला विरोध केला होता. महामार्गाचे काम चालू असताना अनेक वृक्ष जमीनदोस्त करण्यात आली. त्यातच हा वटवृक्ष देखील सामील होणार होता. परंतु स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी हा वृक्ष वाचवण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरु केले.
@@AUTHORINFO_V1@@