सांगलीत नागरिकांचा हैदोस ! उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |

Sangli_1  H x W
 
 
सांगली : सांगलीतील इंदिरानगरमध्ये काही नागरिकांचा हैदोस पहायला मिळाला. या भागामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केलेल्या नागरिकांपैकी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी परिसर सील केला होता. मात्र, तेथील रहिवाश्यांनी याला जोरदार विरोध केला. शनिवारी दुपारी संतप्त नागरिकांनी कंटेनमेंट झोनचे बॅरिकेट्स आणि पत्रे काढून उद्ध्वस्त केला. याशिवाय वैद्यकीय तपासणीलाही नागरिकांकडून विरोध केला आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.
 
 
सांगली जिल्ह्यामध्ये काही ग्रामीण भाग वगळता महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच जास्तीतजास्त नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. अशामध्ये शुक्रवारी केलेल्या अँटिजेन टेस्टच्या अहवालात २३ जणांचा आला आणि इंदिरानगर परिसर सील करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी निर्बंध घातले. संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त केला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स उखडून टाकले. विशेष म्हणजे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोरच हे कृत्य सुरू होते.
@@AUTHORINFO_V1@@