‘रोसाई डॉर्फमन’ दुर्मिळ आजारग्रस्त २० वर्षीय श्रुतीवर यशस्वी उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020
Total Views |

Rosai Dorfman_1 &nbs
 
मुंबई : नवी मुंबई येथे राहणाऱ्या २० वर्षांच्या श्रुतीला अंधूक दिसणे, उजवा डोळा तिरळा होणे (इसोट्रॉपिया), कोणत्याही वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे (डिप्लोपिया) आणि २० दिवसांपासून सुरू असलेली तीव्र डोकेदुखी हे त्रास होत होते. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये तिला वाचायला येत नसल्याचे, तसेच उजव्या डोळ्याने एखादा चेहराही ओळखू येत नसल्याचे आढळून आले. श्रुतीची ‘एमआरआय’ तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ‘इन्फिल्ट्रेटिंग एन्हान्सिंग सॉफ्ट टिश्शू मास लेशन’ असल्याचे दिसून आले. ‘सीटी गाईडेड बायोप्सी’ आणि ‘इम्युनोहिस्टो केमिस्ट्री’ या चाचण्याही करण्यात आल्या. त्यातून श्रुतीच्या आजाराचे निदान निश्चित झाले. तिला ‘रोसाई डॉर्फमन’ हा आजार (आयएचसी: S-100, CD-68 Expressed) झाला होता. हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये ‘लिम्फाडेनोपथी’ वाढलेली आढळते (ही लिम्फ नोड्सची एक स्थिती आहे, यामध्ये हे नोड्स विचित्र पद्धतीने वाढतात). तसेच ताप, न्यूट्रोफिलिया, ल्युकोसिटॉसिस (पांढऱ्या रक्तपेशी वाढणे), ‘इएसआर’ मध्ये वाढ आणि ‘पॉलिक्लोनल गॅमोपॅथी’ ही लक्षणे आढळतात. हा अतिशय दुर्मिळ स्परुपाचा आजार असून १९६९ पासून आतापर्यंत जगात या आजाराचे १००० पेक्षाही कमी रुग्ण आढळून आलेले आहेत.
 
डॉ.अनिल डीक्रूज, डोके-मान कर्करोगावरील तज्ज्ञ, ऑन्कॉलॉजी विभाग संचालक, अपोलो हॉस्पिटल यांनी श्रुतीवर प्रामुख्याने उपचार केले. त्यांनी सांगितले, “सीटी गाईडेड बायोप्सी’ मुळे आम्हाला आजाराचे अचूक निदान करता आले. भारतीय उपखंडातील आम्हाला माहीत असलेली ही केवळ चौथी केस होती. खरे तर हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो, मात्र तो २० वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. या केसमध्ये, सतत डोके दुखत असल्याची रुग्णाची तक्रार होती. तसेच दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून कोणतीही वस्तू अंधूक व दुहेरी प्रतिमांमध्ये दिसत असल्याचीही तिची तक्रार होती. ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची दाट शक्यता होती.”
 
डॉ.सलील पाटकर, मेडिकल ऑन्कॉलॉजी कन्सल्टंट, अपोलो हॉस्पिटल्स यांनी नमूद केले, ‘‘रोसाई डॉर्फमन हा सौम्य स्वरुपाचा विकार असल्याचे समजले जाते; तथापि तो कधीकधी अतिशय तीव्र स्वरुप धारण करतो व त्यावेळी त्यातून (श्रुतीच्या बाबतीत झाली तशी) विकृती निर्माण होते किंवा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ‘रोसाई डॉर्फमन’ या आजाराच्या उपचारांबाबत मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नाहीत. या आजाराची लक्षणे दिसून आली नाही, तर तो आपोआप बरा होतो, असे ५० टक्के केसेसमध्ये दिसून आले आहे. तथापि श्रुतीच्या बाबतीत त्या पर्यायाचा विचार करता येत नव्हता. तिच्या डोळ्यावर परिणाम होऊन तिची दृष्टी कायमची गेली असती आणि तिला ‘इन्ट्राक्रॅनिअल एक्स्टेंशन’ झाला असता. शस्त्रक्रिया हा पर्याय असला, तरी आजाराची जागा व त्याची तीव्रता लक्षात घेता, तो आम्हाला उपलब्ध नव्हता. औषधोपचारही निश्चित नाहीत. अशा वेळी ‘कोर्टिकोस्टेरॉईड्स’ (प्रेडनिसोलोन), ‘व्हिन्का अल्कलॉईड’ व ‘५-एफयू’ यांची केमोथेरपी, ‘इंटरफेरॉन’ ची लहान मात्रा आणि अॅंटीबायोटिक उपचार हाच पर्याय आमच्यासाठी शिल्लक राहिला. रुग्णावर आम्ही ‘स्टेरॉईड्स’ चे उपचार सुरू केले आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला.’’
 
संतोष मराठे, सीओओ-युनिट प्रमुख, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, “दुर्मिळ आजारांचे निदान व त्यांच्या तपासण्या या अतिशय अवघड बाबी असतात. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, डॉक्टरांच्या विशेष पथकाने दुर्मिळ आजार असलेल्या रुग्णांचे निदान करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी श्रुतीच्या केसमध्ये घेतलेले परिश्रम फार मोलाचे आहेत, अन्यथा या मुलीच्या आजाराची गुंतागुंत वाढली असती. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रत्येक अवयवाकरीता स्वतंत्र तज्ज्ञ कन्सल्टंट उपलब्ध आहेत. ते विविध क्लिनिकल चाचण्या व प्रोटोकॉल यांच्या आधारे दुर्मिळ आजारांचे त्वरीत निदान करतात व उपचार देतात.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@