कोरोनाचा विळखा होतोय घट्ट; पंतप्रधान पुन्हा एकदा साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद!

25 Jul 2020 16:34:52

PM CM_1  H x W:



देशात रोज होतेय ४० हजारांहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद!


नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग आणि विषाणूंचे संक्रमण होण्याचा वेग वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोडी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. देशात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. २४ तासांत आयसीएमआरकडून साधारण ४,२०,८९८ लोकांची कोरोना चाचणी केली. गुरुवारच्या तुलनेत ६८,०९७ नवीन लोकांची चाचणी करण्यात आली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ४८,९१६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १३,३६,८६१ वर पोहोचला आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४ तासांत कोरोनामुळे ७५७ लोकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृतांचा आकडा ३१,३५८ वर पोहोचला आहे.


याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. पीएम मोदींनी २७ जुलै रोजी ही बैठक बोलावली आहे, या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चर्चा होणार असल्याचे कळते आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित असतील. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंह बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवसुद्धा सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0