पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी

    दिनांक  25-Jul-2020 20:04:25
|

Education_1  H
 
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळानेही आपला अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
 
 
 
 
 
कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी शालेय शिक्षण विभागाकडून राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच शाळांना आणि विद्यार्थ्यांनाही त्यासाठीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शालेय शिक्षण विभागाकडून केल्या जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका जीआरमध्ये सांगण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने http://www.maa.ac.in/academic-year-syllabus-2020-2021/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.