भाजपा व संघाला आतंकवादी म्हणणे साकेत गोखलेंना भोवणार!

    दिनांक  25-Jul-2020 18:54:08
|

BJYM_1  H x W:


भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी पाठवली कायदेशीर नोटीस


ठाणे : "भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आतंकवादी आहेत", अश्या आशयाचे ट्विट करणे हे काँग्रेसी सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांना महागात पडणार असे दिसत आहे. या ट्विट विरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी मानहानीची केस चालवणार असल्याचे स्पष्ट केले, त्यासाठी त्यांनी रीतसर कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे.साकेत गोखलेने अयोध्येत होणाऱ्या राममंदिर शिलान्यास कार्यक्रमा विरोधात अलाहाबाद येथे उच्च न्यायालयात याचिका केली होती. हा कार्यक्रम होऊ नये अशी याचना केली होती, ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ते अस्वस्थ झाले व संघ आणि भाजपा विरोधात काहीही ट्विट करत सुटले. त्यांचे राहुल गांधी यांच्यासोबत असलेले फोटो व त्यांच्या ट्विट ला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे सतत मिळणारे अनुमोदन यावरून साकेत गोखले हे काँग्रेस पुरस्कृत आहेत हे स्पष्ट दिसते असे यावेळी मयुरेश जोशी यांनी सांगितले.


भाजपा व संघाला उद्देशून केलेल्या या टिपण्णीसाठी साकेत गोखले यांनी जाहीर माफी मागावी यासाठी नोटीस पाठवली आहे. अन्यथा रीतसर मानहानीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाईल, असे मयुरेश जोशी यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.