कौतुकास्पद ! हिमा दासने सुवर्णपदक केले 'कोरोना वॉरियर्स'ना बहाल

    दिनांक  25-Jul-2020 14:23:46
|

Hima Das_1  H x
 
नवी दिल्ली : भारताची सुवर्णकन्या हिमा दासने कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने २०१८मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. हे पदक आता कोरोना वॉरियर्स'ना समर्पित करण्याचा कौतुकास्पद निर्णय तिने घेतला आहे. “देशातील पोलीस, डॉक्टर्स, नर्स सफाई कर्मचारी आदी आदी कोरोना वॉरियर्स आपले रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.” अशा भावना तिने व्यक्त केल्या.
 
 
 
 
हिमा दासने ट्विट केले आहे की, “आशियाई स्पर्धा २०१८मधील ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेतील सुवर्णपदक मी डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित करत आहे. या आव्हानात्मक परिस्थिती आपल्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी हे वॉरियर्स नि: स्वार्थपणे सेवा करत आहेत. त्यांना सलाम.”
 
 
हिमाने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने यावेळी सुवर्णपदक जिंकले होते. परंतु, त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. यासर्व प्रकारामुळे भारताच्या रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले. हिमाने हे सुवर्णपदक कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित केले  आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.