आज्जींना सोनू सूद म्हणाला, 'मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या, मी मदत करतो !

    दिनांक  24-Jul-2020 19:07:56
|

sonu sood_1  H
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बनाटी फिरवून कर्तब दाखवणाऱ्या आजी शांताबाई पवार यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोटाची खळगी भागवण्याठी उन्हातान्हाची पर्वा न करता आपले कौशल्य दाखवत होत्या. लॉकडाऊनमध्ये बंद झालेला कामधंदा रस्त्यावर फिरणारी तुरळक गर्दी येऊन त्यांना आपापल्या परीने मदत करत होती.

दरम्यान, हा व्हीडिओ सोनू सूदने पाहिल्यानंतर त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. "मला आजींचा पत्ता द्या, त्यांची जागा तिथे नाही, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवता येतील, अशी एक छोटीशी कार्यशाळा मला सुरू करायची आहे, त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे मला सांगा, असे आवाहन त्याने केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.