चीनला दणका ! चीनमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा रद्द

    दिनांक  24-Jul-2020 16:52:48
|

WTA_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : कोरोना महामारीचे मूळ असलेल्या चीनला एकाकी पाडण्याचे सर्व प्रयत्न जागतिक राजकारणामध्ये होत आहेत. चीनमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने चीनविरोधात जगभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. जगातील अनेक स्पर्धा रद्द केल्या तर काही महत्त्वाच्या स्पर्धा या पुढे ढकलण्यात आल्या. आता विमेन्स टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) आणि असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीएस) यांनी चीनमधील सर्व आयोजित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनला चांगलाच दणका बसला आहे.
 
 
 
एटीपी आणि डब्ल्यूटीए यांनी चीनमध्ये होणाऱ्या सर्व ११ स्पर्धा रद्द केल्या. कोरोना महामारीच्या संकटात चीनमध्ये टेनिस स्पर्धा खेळवण्याचा धोका पत्करणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. या स्पर्धांचे ठिकाण बदलण्याचे किंवा तारखा बदलण्याऐवजी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. डब्ल्यूटीएचे चेअरमन स्टीव्ह सायमन यांनी सांगितले की, “चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धा रद्द करण्याची घोषणा करताना आम्हाला दुःख होत आहे. चीनच्या निर्णयाचा आम्ही सन्मान राखतो, परंतु लवकरच सर्व ठिक होईल अशी अपेक्षा आहे.”
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.