राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ नका : साकेत गोखले

24 Jul 2020 11:26:46

saket_1  H x W:



राहुल गांधींच्या निकटवर्तीय पत्रकाराने केली अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल!



प्रयागराज : राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्टला भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मात्र भूमिपूजनाचा कार्यक्रम हा कोविड अनलॉक २च्या मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन करत असून भूमिपूजनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


राहुल गांधींचे निकटवर्तीय, दिल्लीतील पत्रकार साकेत गोखले यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. देशात कोरोनाचे संक्रमण अद्याप सुरू आहे. जवळपास तीन महिन्यांच्या दीर्घ लॉकडाऊननंतर आता अनलॉक २ ची प्रक्रीया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक २ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.


कोरोनाचे संकट कायम असताना अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी जवळपास ३०० लोक उपस्थित राहणार असून, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे यामुळे उल्लंघन होत असल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे.




Powered By Sangraha 9.0