जयघोष करतात छत्रपती शिवरायांचा ; वर्तन मात्र सुलतानाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

mangalprabhat loadha_1&nb



पोलिसांची महिला लोकप्रतिनिधीना धक्काबुक्की ; मंगल प्रभात लोढांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल



मुंबई :
बेस्टच्या वीज ग्राहकांना भरमसाट बिले आणि वीज खंडित करण्याची धमकी देणाऱ्या महाव्यवस्थापकांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला लोकप्रतिनिधींना पोलिसांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा भाजपकडून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणाऱ्या या राज्यात महिला लोकप्रतिनिधींसोबत असभ्य वर्तन घडत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित असेल ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे अशी भीती भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही माहिती दिली.




लोढा म्हणाले की, बेस्ट महाव्यवस्थापकांनी पोलिस बळाचा वापर करून घेरावमधून पळ काढताना पोलिसांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींशी असभ्य वर्तन केले. यावेळी पुरुष पोलिसांनी महिला नगरसेविका व कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केली. वास्तविक त्याठिकाणी महिला पोलीस उपस्थित होत्या. तरीही पुरुष पोलिसांनी महिला लोकप्रतिनिधींशी धक्काबुक्की करत, अरेरावी आणि शिवीगाळीची भाषा वापरत असभ्य वर्तन केले. भाजपच्या महिला नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, शीतल गंभीर देसाई, स्वप्ना म्हात्रे, रिटा मकवना, नेहल शाह, सरिता पाटील, ज्योत्स्ना मेहता, अनुराधा पोतदार, हर्षिता नार्वेकर यांना पोलीस आणि बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली आहे. पोलिसांच्या या असभ्य वर्तनाचा आणि महाव्यस्थापकांच्या उद्दाम वर्तनाचा जाहीर निषेध करतांनाच, महिलांशी असभ्य वागणाऱ्या पोलीस आणि बेस्ट कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लोढा यांनी यावेळी केली.




कोरोना टाळेबंदी काळात लोकांचे उत्पन्न कमी झालेले असताना वीज दरात सवलत देण्याऐवजी जनतेला वाढीव वीज देयके पाठविण्यात आली आहेत. त्याविषयात भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट मागितली असता सातत्याने भेट नाकारण्यात आली. ज्या लोकप्रतिनिधींना भेट दिली गेली त्यांना असमाधानकारक उद्दाम उत्तरे दिली गेली. त्यातच जनतेला एसएमएस करून वाढीव देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी बेस्ट कडून दिली जात आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंजताना टाळेबंदीमुळे अडचणीत असलेल्या जनतेला याप्रकारे खिंडीत गाठणे हे पूर्णतः अयोग्य आहे. त्यामुळे वाढीव वीज देयकांविषयीचा निर्णय येईपर्यंत वीज पुरवठा तोडणार नाही, असे जाहीर करावे इतकीच मागणी करत गुरुवारी मुंबई शहर भाजप नगरसेवकांनी मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, भाजप मनपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वात बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतली. परंतु बेस्ट महाव्यवस्थापकांनी लोकप्रतिनिधींना उद्दाम उत्तरे देत मूळ प्रश्नाला सातत्याने बगल दिली. कोरोनाग्रस्त मुंबईबद्दल बेस्ट महाव्यवस्थापकांचे वर्तन अत्यंत असंवेदनशील असल्याचे दिसले. पाच तास घेराव घातल्यानंतरही त्यांनी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न देता उलट पोलिसी बाळाचा वापर करत तेथून पळ काढला. बेस्ट महाव्यवस्थापकांचे एकूण वर्तन बेजबाबदार, उद्दाम आणि मुंबईकरांप्रती बेफिकिरीचे होते.

वास्तविक कोरोना काळात कोणत्याही वीज ग्राहकाची वीज खंडित करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असताना वीज खंडित करण्याची धमकी देऊन बेस्ट महाव्यवस्थापक उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे बेस्ट महाव्यवस्थापकांवर शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. वाढीव वीज देयकांच्या विषयात सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोवर भाजपचे हे आंदोलन सुरूच राहील, किंबहुना ते अधिक तीव्र केले जाईल, असे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@