कड्याक्याच्या थंडीत जवानांचा चीनशी संघर्ष सुरू

24 Jul 2020 19:31:05

indian army_1  



नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवर स्थिती अद्याप सामान्य झाली नाही. या भागत तणाव कायम आहे. रणनिती आणि लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेर्यानंतरही चीनी सैन्य पूर्णपणे मागे हटले नाही. पुढे कॉर्प्स कमांडरची बैठक होणार की, नाही याबद्दलही अनिश्चितता आहे. चीनसह दीर्घकाळ ही तणावाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.


हिवाळयापर्यंत ही स्थिती अशीच राहू शकते. पूर्व लडाखसारख्या उंचावरील क्षेत्रामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये पहारा देणे सोपे नाही. कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावताना भारतीय सैन्याला विशेष गणवेश, शेल्टर्स, तंबू, इंधन आणि अन्य साहित्याची आवश्यकता भासणार आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी पुरेसे धान्य आणि अन्य आवश्यक साहित्य पुरवण्याची प्रक्रिया भारतीय सैन्याने सुरू केली आहे.पँगाँग टीएसो आणि हॉट स्प्रिंग-गोग्रामधून अजूनही चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घेतलेली नाही.


लडाखमध्ये तैनात असणाऱ्या सैन्यासाठी वर्षाला एकूण ३० हजार मेट्रिक टन रेशनची गरज लागत असेल, तर आता दुप्पट रेशनची गरज लागणार कारण तिथे अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत, असे एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याने सांगितले. चीन लगेच मागे हटणाऱ्यातला नाही. त्यामुळे आम्ही पद्धतशीरपणे दीर्घकाळाच्या दृष्टीने तयारी करत आहोत. हिवाळयात लागणाऱ्या आवश्यक साहित्याची साठवणूक करुन ठेवणे सुद्धा सुरू आहे.


चीनने कुठलीही आगळीक करू नये, यासाठी हिवाळयातही या भागांमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य ठेवावे लागेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरू आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ४0 पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत.







Powered By Sangraha 9.0