भारत कोरोनाविरुद्ध लढा जिंकेल : WHOला विश्वास

24 Jul 2020 12:31:36
WHO_1  H x W: 0
 
 
 
जिनेवा : कोरोना (Coronavirus) विरोधात सुरू असलेल्या युद्धाचा अमेरिकेसह देशातील बलाढ्य देशांना फटका बसला. मात्र, भारत या लढाईत यशस्वी होईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. अमेरिका, ब्राझिल आणि भारत या देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरीही हे देश कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. 
गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेचे आणीबाणी प्रमुख डॉ. माईक स्यान यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणतात, "भारत, अमेरिका आणि ब्राझईल शक्तीशाली, सक्षम आणि लोकशाही देश आहेत. कोरोना महामारीशी लढण्यात या देशांमध्ये जबरदस्त क्षमता आहे.
 
 
 
सर्वात पहिल्या क्रमांकावर अमेरिका त्यानंतर ब्राझील व तिसऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक येतो. अमेरिकेत कोरोनाचे एकूण ४० लाख रुग्ण झाले आहेत. प्रत्येक तासाला २६ रुग्ण आढळत आहेत. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाशी लढण्याच्या क्षमतेबद्दल भारताचे कौतूक केले होते. व्यापक स्वरुपात कोरोना चाचण्या करण्यात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक येतो. यापूर्वीही भारताच्या प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने स्तुती केली आहे. भारत कोरोनाविरोधातील लढाईत सदैव तत्पर राहीला आहे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. चाचण्यांची संख्या वाढवणे, कोविड रुग्णालये उभारणी करणे, आवश्यक वस्तूंचे वाटप आणि औषधांचे वितरण या सारख्या तयारीमुळे भारताचे कौतूक करण्यात आले आहे. 
 
 
 
 
 

Powered By Sangraha 9.0