अखेर आयपीएलची घोषणा ! १९ सप्टेंबरला वाजणार बिगुल

    दिनांक  24-Jul-2020 15:00:40
|

IPL 2020_1  H x
 
 
मुंबई : अखेर आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनावरून पडदा उठला आहे. आयसीसी टी – २० पुढे ढकल्यानंतर आयपीएल २०२०चा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर भारतीय क्रीडा विश्वाला अधिकृत घोषणेची आतुरता होती. आता आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा केली, मात्र अद्याप सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच, युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
 
 
“विविध भागधारकांशी सल्लामसलत करुन, आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर औपचारिकरित्या प्रशासकीय समिती बोलावली जाणार आहे. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला हे होईल, अशी आम्हाला आशा आहे. स्पर्धेमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होऊ शकतात. आयपीएलचे सामने हे आधीच्या स्वरुपानुसारच होणार आहे. क्रिकेटपटूना कमी थकवा, तर ब्रॉडकास्टरना अधिक कमाईसाठी उपयुक्त असतील.” असे ब्रिजेश पटेल म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.