शिवसेना व राष्ट्रवादीला काँग्रेस झाली 'नकोशी' : अवधूत वाघ

24 Jul 2020 15:16:06
Avdhut wagh_1  


अपमान होऊनही काँग्रेसला सत्तेची लालसा; अवधूत वाघ यांची काँग्रेसवर टीका

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातही महाविकास आघाडीत मंत्रिपदबदल सुरूच आहेत. तर काँग्रेसला वेळोवेळी डावलले जात असल्याचा सूर काँग्रेस नेत्यांनी लावला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. १५ मे रोजी पालकमंत्री पदाचा कारभार इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आला. आता पुन्हा पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार वडेट्टीवार यांच्याकडून काढून शिंदे यांना देण्यात आलेला आहे. वडेट्टीवार यांच्याकडे हा कार्यभार तात्पुरता स्वरूपाचा होता, असेही सांगण्यात आले. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या.







यावरून भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला कॉंग्रेस ‘नकोशी’ झाली आहे. ‘सारथी’वरुन काढलं विद्युत महामंडळाच्या संचालक पदांवरून काढलं. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. एवढा अपमान होऊनही लाचार कॉंग्रेस अजून निर्लज्जासारखी सत्तेला चिकटून बसली आहे. थोडी लाज वाटली पाहिजे’, असे ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे.


मंत्रीबदल सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील नाराजीनाट्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून ही नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवण्यात आली. यामुळे अपमान होऊनही काँग्रेसला सत्तेची लालसा असल्याची टीका अवधूत वाघ यांनी केली.




Powered By Sangraha 9.0