‘अब है रोजगार की बारी!’ म्हणत सोनू सूदने लाँच केले अ‍ॅप!

23 Jul 2020 09:48:17
Sonu sood_1  H


स्थलांतरितांना घरी सोडणारा सोनू सूद आता रोजगार मिळवण्यास मदत करणार!


मुंबई : स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.‘प्रवासी रोजगार’ नावाने अ‌ॅप लाँच करत स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तो पुढे सरसावला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने याबद्दलचा खुलासा केला आहे.


कोरोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना, मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. यासाठी त्याने प्रवासा रोजगार या नावाने अ‌ॅप लाँच केले असून मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व लिंक्स या अ‌ॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.







याबाबत बोलताना “हे काम सुरू करण्यासाठी किंवा हे पाऊल उचलण्यासाठी गेले अनेक दिवस मी प्लॅनिंग करत होतो, त्यावर विचार करत होतो. या कामानिमित्त समाजातील अनेक क्षेत्रांतील लोकांशी माझे बोलणे सुरू होते. मग त्यामध्ये तरूण, स्वयंसेवी संस्था, ग्रास रूटला काम करणाऱ्या संस्था तसेच मजूर वर्ग यांच्याशी माझा संवाद झाला तसेच त्यांच्याशी मी सल्लामसलत केली”, असे सोनू सूदने सांगितले.


या अ‌ॅपच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतल्या अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. यासंबंधीची सगळी माहिती या अ‌ॅपमध्ये असेल. जवळपास ५०० कंपन्यांमधील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्यास हे अ‌ॅप उपयुक्त ठरणार आहे. कापड व्यवसाय, बांधकाम उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाईल्स, ई कॉमर्स या आणि अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमधली नोकरीची माहिती या अ‌ॅपमधून मिळणार आहे.






Powered By Sangraha 9.0