५ ऑगस्टचा मुहूर्त अशूभ : शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

    दिनांक  23-Jul-2020 14:59:16
|

Shankaracharya _1 &n

 
 
अयोध्या : राम मंदिर शिलान्यास निर्माणाची वेळ ठरवण्यात आली आहे. मात्र, आता मंदिर निर्माणाच्या वेळेवर शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शंकराचार्य यांनी मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त अशूभ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "मी रामभक्त आहे, मंदिर कुणीही बनवावे परंतू मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त हा शुभ असायला हवा. मंदिर जनतेच्या मदतीने बनत आहे तर त्यांचेही मत जाणून घेतले पाहिजे."
 
 
 
अयोद्धेत राम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर काही प्रतिक्रीया येत आहेत. अयोद्धेतील संत समाजाने स्वरुपानंद यांना आव्हान दिले आहे. त्यांनी शास्त्रार्थज्ञान ५ ऑगस्ट रोजी येऊन सिद्ध करावे. यावर शंकराचार्य म्हणाले, "मंदिर निर्माणासाठी शेकडो वर्षे आंदोलन सुरू होते. त्यासाठी मी स्वतः कित्येकदा तुरुंगात गेलो आहे. परंतू ५ ऑगस्टची वेळ का निवडली हे माझ्या आकलनाबाहेर आहे." 
 
 
 
स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, "अयोद्धेतील राम मंदिराचे निर्माण कंबोडिया अंकोरवाट मंदिराच्या पद्धतीनुसार बनायला हवे. चालुक्य नरेशांचे राज्य तिथे होते. ११ व्या शताब्दीत नरेशांनी तिथे एक भव्य मंदिर तयार केले, मंदिर एकदाच बनवले जाईल, त्याची विशालता  आणि भव्यता याचेही लक्ष्य हवे."
 
 
अंकोरवाट: सर्वात मोठे धार्मिक स्थळ

अंकोरवाट कंबोडियामध्ये तयार करण्यात आलेले मंदिर 162.6 हेक्टरमध्ये पसरले आहे. खमेर साम्राज्यात भगवान विष्णूच्या प्रतिमेत बनवलेले मंदिर आहे. मी कांग नदी किनाऱ्यावर सिमरिप शहरा तयार करण्यात आलेले विश्वातील सर्वात मोठे हिंदू मंदिर मानले जाते. हे मंदिर मेरू पर्वताचेही प्रतिक आहेत. या मंदिराच्या भींतींवर प्राचीन प्रसंग कोरले आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.