पाक लष्कराकडून भारताच्या हद्दीत गोळीबार : महिला जखमी

23 Jul 2020 13:15:02
Map_1  H x W: 0

जम्मू : एलओसीनजीकच्या गावात पाकिस्तानी लष्करातर्फे गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हाजीत्रा गावातील तांग्धार सेक्टरच्या वस्तीत पाकने हा भ्याड हल्ला केला. यात एक महिला जखमी झाली, रात्री तिला नजीकच्या रुग्णालयात हलवले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या हद्दीतून अशाप्रकारच्या कुरापती आणि हल्ले वारंवार झाल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ल्याद्वारे नागरिकांची घरे उद्धस्त करण्याचा प्रकार केला जात होता.




Powered By Sangraha 9.0