“...तर देशात १ लाख कोरोनारुग्न सापडतील”

23 Jul 2020 15:00:17

Harbhajansingh_1 &nb
 
मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ४५ हजार कोरोनारुग्ण आढळून आले असून १, १२९ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंगने चिंता व्यक्त केली आहे. त्याने ट्विट केले आहे की, “असेच चालू राहिले तर भारतात दिवसाला एक लाख करोनाचे रुग्ण सापडू शकतात”
 
 
 
 
 
भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये देशात एकूण ४५, ७२० रुग्ण सापडले असून १,१२९ कोरोनारुग्नांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत आता देशामध्ये आतापर्यंत १२ लाख ४० हजार कोरोनारुग्न सापडले आहेत. तर, कोरोनामुळे २९, ८६१ लोकांचा मृत्यू झाल्याचे चित्र आहेत. यावर हरभजनसिंगने व्यक्त केलेली चिंता ही रास्त असून ‘कोणाला काळजी आहे का?’ असा प्रश्नदेखील विचारला आहे.
 
Powered By Sangraha 9.0