पालिकेत भाजप आक्रमक ; महापौर विरोधकांच्या रडारवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0
मुंबई : राज्यात भाजप सरकारविरोधात आक्रमक असताना महापालिकेतही आक्रमक रूप स्वीकारले आहे. विशेषकरून महापौरांना भाजप लक्ष्य करणार असून विरोधकांच्या साह्याने जेरीस आणण्याची शक्यता आहे. महापालिकेसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सभा तसेच निवडणुका या व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याने देऊनही महापौर किशोरी पेडणेकर सभा घेण्याचे टाळत आहेत. तसेच पंतप्रधान निधीतून प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सबाबत महापौरांनी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. त्याबाबतही भाजपने जाब विचारला आहे. त्यामुळे महापौरच भाजपच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
 
भाजपच्या आरोपांना सामोरे जाण्याची ताकद नसल्याने सत्ताधारी पक्ष सभा घेण्यापासून टाळत आहे. पण महापौरांना खिंडीत गाठून नामोहरम करण्याची एकही संधी भाजप सोडणार नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नगरविकास खात्याने ३ जुलै २०२० च्या परिपत्रकाप्रमाणे महापालिकेच्या सभा तसेच समित्यांचे कामकाज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही महापौर या सभा घेण्याचे टाळत आहेत. त्यामुळे नियमाप्रमाणे सभा घेण्याचे भाजपने आवाहन केले आहे.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी वारंवार सभा आणि बैठका घेण्याची मागणी करूनही सत्ताधारी पक्ष या सभा घेण्याचे टाळत आहे. महापौरांनी जुलै महिन्याची बोलावलेली सभाही रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सभा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सभा घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे विरेाधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस सत्तेत सहभागी आहे, पण त्यांच्यात असलेल्या कुरबुरीमुळे विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी तर महापालिकेच्या सभेबरोबरच बेस्टच्या महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभागृहाची मागणी केली आहे. परंतु विरेाधक आणि पहारेकऱ्यांच्या तोफखान्याला सामोरे जाण्याचे धाडस होत नसल्याने महापौर सभा लांबणीवर नेत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आज बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरल्याने भाजपच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी सबुरीने घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@