'ती' बातमी खोटी : बच्चन यांनी ट्विट करून चॅनलला झापले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020
Total Views |

amitabh bacchan_1 &n






मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मेडिकल बुलेटीन निघणार नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले होते. तसेच अमिताभ बच्चन स्वतःच त्यांच्या प्रकृतीची माहिती देतील, असे सांगत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना आश्वस्त केले होते. मात्र, ब्रेकींग न्यूजच्या नावाखाली बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल बातम्या चालवणाऱ्यांवर बच्चन यांना गुरुवारी संताप अनावर झाला. 


एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ट्विट करत बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सांगत लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे म्हटले होते. परंतू या बातमीवर संताप व्यक्त करत ही बातमी खोटी, बेजबाबदार व चुकीची आणि निर्लज्जपणा असल्याचे सांगत बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल सुधारणा होत असून लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची चर्चा दिवसभर होती. खुद्द अमिताभ यांना ट्विट करून याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले.





@@AUTHORINFO_V1@@