2020 वर्ष धोक्याचं! अमेरिकेत भूकंपानंतर त्सुनामीचा प्रकोप !

    दिनांक  22-Jul-2020 20:02:49
|

alaska _1  H x


वॉशिंगटन : अमेरिकेतील अलास्का शहरात भीषण भूकांपाचे धक्के बसले आहेत. यामुळे त्सुनामी प्रलयाचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता एकूण ७.८ रिश्टर स्केल इतकी आहे. याद्वारे भूकंपाची तीव्रता लक्षात येईल. भूकंपाच्या केंद्र स्थानापासून पाचशे मीटर अंतरावर धक्के जाणवले. यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. लोक घराबाहेर सैरावैरा पळू लागले होते. 
यूएसजीएसच्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्र जमीनीपासून सहा मैल दूरवर होते. या केंद्रबिंदूपासून दोनशेमीटरच्या पट्ट्यात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातून विशाल महाकाय लाटा उधळू शकतात. या भागात भूकंप आल्यानंतर बऱ्याच आठवड्यांपर्यंत त्याचे धक्के जाणवत असतात, अशी माहिती आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच हे दुसरे नैसर्गिक संकट ओढावल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.