शाब्बास ! माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलने केले स्वतःचे गाव कोरोनामुक्त...

22 Jul 2020 18:35:58

munaf patel_1  
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे एकीकडे गावागावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, तर काहीजण या काळात पुढे येऊन गरजूंची मदतही करत आहेत. कोरोनामुळे क्रीडा विश्व स्तब्ध झाले असताना अनेक खेळाडूंनी घरी थांबणे पसंत केले. तर, काही खेळाडूंनी रस्त्यावर उतरून मदत केली. असाच एक पराक्रम भारतीय संघाच्या एका खेळाडूने केला आहे. २०११मध्ये विश्वचषक जिंकून देण्यामध्ये या खेळाडूचे योगदान होते. तो खेळाडू म्हणजे मुनाफ पटेल. त्याने स्वताच्या गावामध्ये फिरून समाज प्रबोधन करत गाव कोरोनामुक्त केले.
 
 
गुजरातमधील भरुच जिल्ह्यात इखार या गावामध्ये काही दिवसांपूर्वी बाहेरच्या राज्यामधून आलेल्या ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले गेले होते. मात्र, गावामध्ये कोरोनाबाबत जास्त जणांना माहिती नव्हती. माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलने पुढाकार घेत त्याबद्दळ माहिती पसरवली. त्याचबरोबर करोनापासून वाचायचे असेल आणि त्यावर विजय मिळवायचा असेल तर नेमके काय करायचे, हे गावात सर्व ठिकाणी फिरुन त्याने सांगितले. त्यामुळे गावातील लोकांना करोनाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी हे सुरक्षेचे उपाय करायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच हे गाव करोनामुक्त झाले.
Powered By Sangraha 9.0