जितका काँग्रेस मागे जाईल, तितका देश पुढे जाईल : बबिता फोगाट

    दिनांक  22-Jul-2020 09:50:23
|

Babita_1  H x Wबबिता फोगाटचा काँग्रेसवर हल्लाबोल!


नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू आणि काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केलेल्या बबिता फोगाटने काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाची जेवढी पिछेहाट होईल तेवढाच देश पुढे जाईल, असे ट्विट बबिताने फोगाटने केले आहे.देशात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत असलेल्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारवर वारंवार टीका करत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सांभाळण्यात आलेले अपयश, गलवान खोऱ्यात चीनसोबत संघर्षावरुन भारताची भूमिका अशा अनेक धोरणांवरुन राहुल गांधीनी भाजपला टीकेचे लक्ष्य बनवले होते. सध्या राजस्थानमधील सत्तासंघर्षावरुन काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बबिताने हे ट्विट केले आहे.


बबिताच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रीया पहायला मिळत आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून बबिता आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी सोशल मीडियावर चांगली चर्चेत असते. त्यामुळे बबिताने केलेल्या या टीकेवर येत्या काही दिवसांत काँग्रेस पक्षाकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.