काशीचे ११ विद्वान पंडित, मंत्रोच्चार आणि १२.१५चा मुहूर्त...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020
Total Views |

rammandir_1  H



अयोध्या :
पाच ऑगस्ट रोजी राममंदिराचा भूमिपूजन  सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अयोध्येत पोहोचतील. त्यानंतर राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात सहभागी होतील. 



मिळालेल्या माहितीनुसार एकूण २०० लोक या कार्यक्रमास हजेरी लावतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ऐतिहासिक घटनेत सोशल डिस्टंसिंग व स्वच्छताविषयक नियमांची विशेष काळजी घेतली जाईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सांगितले की, यात १५० पाहुणे असतील.मंदिर निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी अयोध्यातील हनुमानगढी येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतील आणि हनुमानाची पूजा करतील. या सोहळ्यासाठी ट्रस्टने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या रचनेबाबतही निर्णय घेण्यात आला असून मंदिर २ वर्षात पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे.




माहितीनुसार, दुपारी १२ :१५च्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदी ३२ सेकंदात राम मंदिराची पायाभरणी करतील, त्यानंतर त्याचे बांधकाम सुरू होईल. मनिराम कॅन्टोन्मेंटकडून ४० किलो रामशिला देण्यात आल्या असून, त्या स्थापित केल्या जातील. काशीच्या विद्वान ११ पंडितांचा एक गट सकाळपासूनच गर्भगृहात वैदिक मंत्रोच्चारासह पूजेस आरंभ करतील. याचठिकाणी भूमीपूजनही करण्यात येईल.




पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत भेट देत आहेत. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी सुमारे ३ तास रामनगरी अयोध्यामध्ये थांबणार आहेत. भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मंदिराची पायाभरणी करतील. यादरम्यान, ते श्रीराम मंदिराचा पायाभरणी व शिलान्यास करण्यासोबतच अयोध्येतील पर्यटनसंबंधित कार्यक्रम पाहतील. पंतप्रधान मोदी अल्पावधीसाठी अयोध्येत थांबतील आणि यावेळी ते कोणत्याही जाहीर सभेला संबोधित करणार नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@