अफगाणिस्तानातून ७०० भारतीय शीख-हिंदूंची घरवापसी होणार!

21 Jul 2020 14:38:46

Afganisthan_1  



भारत सरकारचा मोठा निर्णय; दिल्लीत केली जाणार राहण्याची व्यवस्था!


नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अलीकडच्या काळात हिंदू आणि शीख यांच्यासह छळाच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत. येथे त्यांना पाक समर्थित दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, भारत सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत जवळपास ७०० शीख आणि हिंदूंना दिल्लीत आणले जाणार आहे. म्हणजेच त्यांना आता भारतात आश्रय दिला जाणार आहे.


लवकरच भारत सरकारच्याकडून त्यांची दिल्लीत येण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यानंतर प्रत्येकाला बर्‍याच काळासाठी व्हिसा मिळू शकणार आहे. अफगाणिस्तानात गेल्या काही महिन्यांत शीख नेते आणि हिंदू वंशाच्या नेत्यांना लक्ष्य केले गेले आहे. काही काळापूर्वी अफगाण शीख नेत्याचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर सुरक्षेबाबत चिंता वाढत होती.


महत्त्वाचे म्हणजे भारतातील बरेच लोक अफगाणिस्तानात कामानिमित्ताने राहतात, अशा परिस्थितीत पाक समर्थीत दहशतवादी संघटना आणि त्यांचे लोक तेथील भारतीयांना लक्ष्य करीत आहेत. यासंदर्भात यापूर्वीही बरीच प्रकरणे घडली आहेत.


भारत सरकारने गेल्या वर्षी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात बदल केला होता. ज्या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात राहणारे हिंदू, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि बौद्ध वंशाच्या लोकांना भारतात आश्रय दिला जाऊ शकतो.




Powered By Sangraha 9.0