खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट ?

21 Jul 2020 21:19:15
Thane _1  H x W
 


 
बदलापूर : शासनाने दर निर्धारित केलेले असतानाही बदलापुरातील काही खाजगी कोविड रुग्णालयांनी भरमसाठ बिल आकारणी केली असल्याचा आरोप करून संबंधित रुग्णालयांचे लेखापरिक्षण करून ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. या सर्व रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण करून बिलाची वाढीव रक्कम रुग्णांना बिलांची वाढीव रक्कम रुग्णांना परत देण्याची मागणी ठाणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली आहे.



बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलांबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. खाजगी कोविड रुग्णांलयाना शासनाने दर निर्धारित करून दिले आहेत. त्यानुसारच रुग्णांना दर आकारणी करणे सक्तीचे असताना या रुग्णालयांनी अवाजवी बिले देऊन नागरिकांची आर्थिक लूट केली असल्याचा श्री. शिंदे यांचा आरोप आहे. शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांनी अश्या अवाजवी स बिलांची पुनर्तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली असून वाढीव बिल परत देण्याची तरतूद आहे.



त्याच धर्तीवर बदलापूर नगर परिषदेनेही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी. गेल्या दोन महिन्यात खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची या लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करून वाढीव बिलाच्या रकमेचा रुग्णांना परतावा देण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे प्रशासक जगदसिंग गिरासे यांना दिलेल्या लेखी निवेदनात श्री. शिंदे यांनी केली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले.







Powered By Sangraha 9.0