जमत नसेल तर कंगनाने चित्रपटसृष्टी सोडावी!

    दिनांक  21-Jul-2020 12:48:18
|

kangana karan_1 &nbsकरण जोहरचा कंगनाला ‘बाष्कळ’ सल्ला!


मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना राणावतने दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला होता. त्यानंतर सोशल मिडीयावर देखील करणला ट्रोल करण्यात आले. यावेळी कंगनाने स्वतःला तसेच नवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या सगळ्या प्रकारानंतर गायब झालेल्या करण जोहरने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.


अभिनेत्री कंगना राणावतला इंडस्ट्रीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तिने कलाविश्व सोडावे असे वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने एका मुलाखती दरम्यान केले आहे.एका कार्यक्रमादरम्यान बोलताना करण म्हणाला, ‘कंगनाने प्रत्येकवेळी असे भासवले आहे की तिच्यावर इंडस्ट्रीमध्ये कायम अन्याय होत आला आहे. तुम्ही असे सतत तुमची दुखःद कारण सांगू शकत नाही. आणि जर कंगनाला असे वाटत असेल तर तिने खुशाल कलाविश्वाला रामराम ठोकावा. कोणीही तिला बॉलिवूडमध्ये थांबवण्याची जबरदस्ती केलेली नाही.’


अभिनेत्री कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होतेय.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.