कल्याण डोंबिवलीत एकूण १६६०२ रुग्ण : २६४ मृत्यू

21 Jul 2020 19:57:05

corona virus _1 &nbs

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २६८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३८१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २६८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १६,६०२ झाली आहे.


यामध्ये ५९१० रुग्ण उपचार घेत असून १०,४२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २६८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -४२, कल्याण प.-६७, डोंबिवली पूर्व -१०१, डोंबिवली प-४७, मांडा टिटवाळा-५, मोहना –५ तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज अनेक दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी आल्याने कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0